थांबलेल्या अनुदानाचा मार्ग मोकळा.५ डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा वेगाने जमा होणार अनुदान| Anudan Update

Anudan Update – नगरपरिषद निवडणुकांमुळे थांबलेले अतिवृष्टी, रब्बी आणि अन्य अनुदान आता जलद गतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ५ डिसेंबरनंतर कर्मचारी कामावर रुजू होताच वितरण प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.

निवडणुकीमुळे अनुदानाचे वितरण थांबले होते! Anudan Update

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सरकारने शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ २५ ते ३०% शेतकऱ्यांच्या खात्यातच पहिल्या टप्प्यात पैसे जमा झाले. उर्वरित बहुतांश शेतकऱ्यांचे अनुदान एकतर अतिशय संथ गतीने वितरीत झाले किंवा पूर्णपणे थांबले. काही भाग्यवान शेतकऱ्यांना एक हप्ता मिळाला, पण दुसऱ्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागली. तर, अनेकांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही.

Leave a Comment